वेकोली कामगाराचा क्वार्टरमध्ये संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST2021-05-10T04:28:28+5:302021-05-10T04:28:28+5:30

घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई कोळसा खाणीत कार्यरत देविदास प्रेमदास उटला (वय ३२) याचा मृतदेह त्याच्या क्वार्टरमध्ये ...

Suspected death of Wekoli worker in the quarters | वेकोली कामगाराचा क्वार्टरमध्ये संशयास्पद मृत्यू

वेकोली कामगाराचा क्वार्टरमध्ये संशयास्पद मृत्यू

घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई कोळसा खाणीत कार्यरत देविदास प्रेमदास उटला (वय ३२) याचा मृतदेह त्याच्या क्वार्टरमध्ये आढळून असल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता चंद्रपूरला पाठविण्यात आला. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

देविदास उटला हा मागील काही महिन्यांपासून एकटाच राहत होता. त्याची आई आणि बहीण तेलंगणात राहत आहे. क्वार्टरच्या बाहेर दुचाकी वाहन आणि दोन दिवसांपासून क्वार्टर आतून बंद असल्याने नागरिकांना संशय आला. नागरिकांनी पोलिसाला कळविले असता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता देविदास मृतावस्थेत आढळून आला. त्याचा नेमका मृत्यू कसा झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल.

Web Title: Suspected death of Wekoli worker in the quarters