शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्व्हेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे. पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । परतीच्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिकांची नासाडी होत आहे. ऑक्टोबर महिना संपत असतानाही पावसाचा परतीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मागील दोन महिन्यापासून विश्रांती घेतली नसल्याने पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून संततधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.सध्या शेतामध्ये कापुस, तूर, सोयाबीन आदी पिक फळधारणेवर आहे.काही भागात पिकांची चांगली फळधारणा होत आहे. मात्र पावसामुळे हाती येणारे पीक गमवावे लागेल, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे.पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाचा सामना करावा लागत आहे.शेतात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ना त्या कारणामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांकडे शासनाने लक्ष देवून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.सध्या शेतामध्ये सोयाबीनची कापनी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे ते पिक ओले होत असून मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीसाठी हातात पैसे येईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा यावर्षीही त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सध्या तरी अंधारात असून मदत करणे गरजेचे आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाचेही दुर्लक्षया ना त्या कारणामुळे सतत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेही यावर्षी अवकृपा केली आहे. यावर्षी प्रथम पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर येणाऱ्या सततच्या पावसामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती