शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात अचानक उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी नसते. शिवाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने दुपारनंतर चंद्रपुरातील रस्त ओस असतात.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे तीनतेरा : चंद्रपूरकरांना झालंय तरी काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचे प्रत्येक गावात पालन होत आहे. चंद्रपुरातही लॉकडाऊन उत्तम पाळला जात आहे. मात्र अचानक सोमवारी हजारो नागरिक वाहने घेऊन रस्त्यावर आली आणि लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. जटपुरा गेटवर तर चारचाकी आणि दुकाकी वाहनांची लांबच लांब राग लागली होती. चंद्रपूरकरांची ही कृती निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरली.मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी नसते. शिवाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने दुपारनंतर चंद्रपुरातील रस्त ओस असतात. मात्र सोमवारी अचानक चंद्रपूरकरांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. अचानक हजारो नागरिक आपापली वाहने घेऊन रस्त्यावर आली. जटपुरा गेटवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहत आहे. त्यामुळे शेकडो वाहनांची रांग जटपुरा गेटवर दिसून आली. नागरिकांची एवढी मोठी संख्या बघून पोलीसही चक्रावले. अखेर एक एक वाहनांची पोलिसांनी कसून चौकशी केली. ज्यांच्याकडे पास होते, त्यांना सोडण्यात आले आणि ज्यांच्याकडे कुठलेही पास आढळून आले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पास नसणाऱ्यांची संख्या अधिक होती, असे पोलीस सुत्राने सांगितले.नेमकी किती जणांवर कारवाई केली, याबाबतचा आकडा मंगळवारी माहिती होणार आहे.अतिरिक्त एसपींकडून तपासणीचंद्रपुरात सोमवारी अचानक बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याने याची गंभीर दखल अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घेतली. ते स्वत: ताफ्यासह जटपुरा गेटवर पोहचले. त्यांनीदेखील जटपुरा गेटवर स्वत: अनेक वाहनांची तपासणी करीत विनाकारण घराबाहेर पडणाºया नागरिकांवर कारवाई केली.मनपाचे पास मिळताच नागरिक रस्त्यावरमागील काही दिवसांपासून महानगरपालिकेद्वारे नागरिकांना बाजारपेठेत येण्यासाठी पास वितरित करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश जणांना अशा पास मिळाल्या आहेत. यात कुटुंबप्रमुख आणि इतर दुसरा व्यक्ती यांचे नाव असून त्यांनाच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडता येते. मात्र एकाच दिवशी सर्व नागरिक बाहेर पडू नये म्हणून महानगरपालिकेने प्रत्येक कुटुंबाला आठवड्यात एक दिवस घराबाहेर पडण्यासाठी निश्चित करून दिला आहे. मात्र बहुतांश नागरिकांनी पासमधील दिवस बघितला नसेल आणि पास घेऊन घराबाहेर पडले असेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या