शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: February 7, 2016 01:59 IST

नवराष्ट्र निर्मितीसाठी शाळेतील विद्यार्जनाबरोबरच राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेच्या विचाराची गरज आहे, असे मत घुग्घुस ...

गाडेकर महाराज : घुग्घुसमध्ये तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळाघुग्घुस : नवराष्ट्र निर्मितीसाठी शाळेतील विद्यार्जनाबरोबरच राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेच्या विचाराची गरज आहे, असे मत घुग्घुस येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संताच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्धवराव गाडेकर महाराज यांनी व्यक्त केले.या सत्राचे उद्घाटन गुरूकुंज येथील दास टेकडीचे अध्यक्ष डॉ. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव खवसे महाराज, बंडोपंत बोढेकर, हळदे महाराज, जि.प. चे शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एम.जी. पिंपळकर, प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे, जनता विद्यालय तथा महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम धोपटे, उपप्राचार्य डॉ. हेलवटे, उपसरपंच संतोष नुने व ग्राम गीताचार्य गणेश शिरपूरकर यांची मंचावर उपस्थिती होती.शाळेतील शिक्षणातून ज्ञान मिळते. पण जीवनात आदर्श जीवन कसे जगावे, यासाठी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतून आत्मसात करण्याची गरज आहे, असे गाडेकर महाराज यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी ग्रामगीताचार्य गणेश शिरपूरकर यांचा सत्कार करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ८ ते १० व ११ ते पदवीधर अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अ गटातून हर्षाली जेवूरकर हिने प्रथम पारितोषिक, प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या द्वितीय व तृतीय अनुक्रमे सपना येरगुडे, पायल बंडू धांडे हिने पटकविला. ब गटात मोरवा विद्यालयाच्या कोयल नवले हिने प्रथम, चिंतामणी कॉलेजचा राकेश जुनघरे द्वितीय तर आंबेडकर कॉलेजच्या मेघा बावणे हिने तृतीय पारितोषिक पटकाविले. तत्पूर्वी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात जिनेश्वर रामदास दिघोरे जनता विद्यालय, द्वितीय रंजना मलेश सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवी तर तृतीय बक्षीस कोमल कालिदास नवले या प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थिनीने पटकविला. या विद्यार्थ्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र घोटकर, प्रास्ताविक रमाकांत माधारे तर आभार रमेश बोबडे यांनी मानले. कार्यक्रमात या परिसरातील विद्यालय, महाविद्यालय व मोठ्या संख्येने शिक्षक व नागरिक उपस्थित होते. दुपारी २ वाजता सर्वधर्म परिषद व व्याख्यानमाला आयोजित आहे. (वार्ताहर)