शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप

By admin | Updated: December 16, 2015 01:21 IST

मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते.

आदेशाची पायमल्ली : ११ दिवसांपासून विद्यार्थी अध्ययनापासून वंचितखडसंगी : मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.व्ही. डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याध्यापकांना इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याचे तोंडी आदेश देत व्हिजीट बुकवर नोंद केली. मात्र मुख्याध्यापक डी.डी. पवार यांनी संबंधित शिक्षकांना रूजू न करता शाळेतून पोबारा केला. त्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तिव्र केले आहे.चिमूर येथील क्रीडा शिक्षक विकास मंडळाद्वारे सावरगाव येथे १९८७ पासून सर्वांग विकास विद्यालय चालविले जात आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा, गावातील विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणाचे धडे घेतात मात्र संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही तर तासिका तत्वावर शिक्षकांच्या अनधिकृत नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.मागील तीन महिन्यांपासून इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी ४ डिसेंबरला शाळेवर बहिष्कार टाकत शाळेत जाणे बंद केले. या आंदोलनाने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी दखल घेत शाळेत येवून पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अलोणे नामक शिक्षिका व चौधरी नामक शिक्षक रूजू होण्यासाठी आले असता, मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना रूजू करण्यास नकार दिला व दुपारी शाळेतून पोबारा केला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त होवून शाळेला कुलूप ठोकले. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला बगल देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त पालकांनी मंगळवारी चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयत धडक दिली. संस्था चालकांच्या वादात आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही व आमच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत आम्ही शाळेचे कुलूप काढणार नसल्याचा पवित्र पालक व विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)शिक्षकांचा बैठा सत्याग्रहनियमितपणे शिक्षक शाळेवर आले. मात्र शाळेला पालक व विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक कार्य करता न आल्याने दरी टाकून शाळेच्या पटांगणात आपले कर्तव्य पार पाडावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठीही शिक्षकांना गावात जावे लागत होते. शालेय दस्याऐवज नसल्याने नवीन रजिस्टर आणून आपली उपस्थिती दाखवित इतर कामे करावी लागली.