शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:36 IST

पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार .....

ठळक मुद्देसुब्बई आश्रमशाळेतील प्रकार : ट्रकमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास

प्रवीण मेकर्तीवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसुब्बई : पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार लोकमतच्या पाहणीत आढळून आला आहे. राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील श्री शिवाजी आश्रमशाळेतील या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित श्री शिवाजी आश्रमशाळा सुब्बई येथे सुरु आहे. या शाळेमधील विद्यार्थी वसतिगृहात निवासी राहतात. परंतु या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत असल्याचा तक्रारी आहेत.विशेष म्हणजे, सदर शाळा अतिदुर्गम भागात आहे. शाळेबाबत अनेक तक्रारी असल्या तरी कोणतेही प्रशासकीय अधिकारी चौकशीसाठी या शाळेत आले असता ते येण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापनाला त्याची भनक लागते. त्यामुळे शाळेतील गैरकारभार उघडकीस येत नाही.विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याबाबतचे वृत्त यापूर्वीच ‘लोकमत’ने प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित केल्यानंतर अधिकाºयांकडून धातूर-मातूर कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे आश्रमशाळेतील भोंगळ कारभार काही कमी झालेला नाही.२८ ते ३० आॅगस्ट या दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा देवाळा येथील आश्रमशाळेत आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सुब्बई येथील आश्रमशाळेने आपले ८० विद्यार्थी पाठविण्याचे ठरविले. यात ४४ विद्यार्थी तर ३६ विद्यार्थिनी आहेत. या वर्ग पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व ८० विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा व्यवस्थापनाने एका ट्रकमध्ये चक्क जनावरांप्रमाणे कोंबून आज रविवारी देवाळा येथे रवाना केले. शासनाकडून अनुदान दिले जात असले तरी केवळ पैसे वाचविण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या माथी हा जीवघेणा प्रवास लादला जात आहे.प्रवासात शिक्षक नाहीविशेष म्हणजे, क्रीडा स्पर्धांसाठी सुब्बई आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना देवाळा येथे एकाच ट्रकमध्ये कोंबून नेणे अन्यायकारक आहे. असे असताना दुसरा संतापजनक प्रकार म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत एक शिक्षक पाठविण्यात आला नाही. क्रीडा शिक्षकही या प्रवासात विद्यार्थ्यांसोबत नव्हते.क्रीडा स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. खासगी वाहनाने त्यांना नेण्यात आले. प्रवासात क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत होते की नाही, याबाबत माहिती नाही.-व्ही.व्ही. कोडापे,अधीक्षक, सुब्बई आश्रमशाळा.