शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर बाजार अन् गावाला अतिक्रमणाचा आजार

By admin | Updated: January 27, 2015 23:30 IST

चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या

बाबुराव परसावार - सिंदेवाहीचंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे करण्यात आली नाहीत, हे या नगराचे दुर्दैव आहे.सिंदेवाही हे गाव चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असून तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक पुढाऱ्याकडून,त्यांच्या कार्यकर्त्याकडून अडचणी, तक्रारी व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे गावाच्या विकासामाध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. गावातील अरुंद रस्ते, रस्त्यावर खोलगट खड्डे, कचऱ्याचे ढिग, सांडपाण्याची गैरसोय यामुळे गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाळ्यात बाजार चौकातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावरुन दुचाकी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. जुन्या बसस्थानकापासून गावात प्रवेश करताना दोन फूट गल्लीतून यावे लागते. समाज मंदिराची दुर्दशासिंदेवाहीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भर घालणारे येथील समाज मंदिर सध्या दुर्दशेत उभे आहे. सिंदेवाही ग्रामपंचायतीने १९८४ मध्ये समाज मंदिर बांधले. त्यानंतर आमदार निधीतून पाच लाख रुपये खर्चून सभागृह व त्यावर शेड बांधण्यात आले. त्यामुळे या समाज मंदिरात सभा, संमेलन, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. सभागृहावरील सिमेंट शेड ठिकठिकाणी तुटलेले असून पावसाळ्यात संपूर्ण सभागृह गळते. व्यासपीठावरील खोलीचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत, समाज मंदिरात विद्युत व्यवस्था नाही. पूर्वी लग्न समारंभ व नाटकाकरिता समाज मंदिर किरायाने दिल्या जात होते. परंतु व्यवस्था नसल्यामुळे या समाज मंदिरात होणारे कार्यक्रम बंद झाले आहेत. आठवडी बाजार गैरसोयीचादर सोमवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजाराच्या विकासाची व सुधारण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. सध्या रस्त्यावर भरत असलेल्या आठवडी बाजारात अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. बाजार रस्त्यावर भरत असल्यामुळे रस्ते रहदारीकरिता अडचणीचे झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याची दुकाने असल्यामुळे ग्राहकांना बाजारात वस्तू व भाजीपाला खरेदी करणे कठीण होवून बसले आहे. आठवडी बाजारासाठी बाजार चौकात जागा होती. परंतु अतिक्रमणामुळे व शॉम्पिंग कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे आठवडी बाजाराची जागा संपुष्टातत आली. गावातील रस्त्यावर दुकाने थाटलेली असतात.