शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क न भरल्याने ऑनलाईन शिक्षण बंद केले; पालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागाला निर्देश दिले.

ठळक मुद्देनारायणा विद्यालयातील प्रकार : पालकमंत्र्यांनी घेतली तत्काळ दखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना काळातील मागील चार महिन्यांपासून ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क भरले नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण बंद केल्याचा प्रकार येथील नारायणा विद्यालयात घडला. यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागाला निर्देश दिले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल देशमुख व शिक्षण विभागाचे अधिकारी काकडे, गादेवार यांनी शाळेला भेट देवून शाळा व्यवस्थापनासोबत चर्चा करून त्वरित ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात सांगितले. व्यवस्थापनाने १२ तासांचा अवधी मागितला. परंतु काही तासांतच ऑनलाईन शिक्षणाची लिंक सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. जवळपास ६०० विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण बंद करण्यात आले होते.कोरोनाच्या काळात कुठल्याही विद्यर्थ्यांकडून शुल्कासाठी सक्ती करू नये, असे शासनाचे आदेश असतानासुद्धा या विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना शुल्कासाठी तकादा लावण्यात आला होता. काही पालकांनी याबाबत विद्यालयाला निवेदन दिले. परंतु १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटूनही विद्यालयाने या निवदेनाची कुठलीही दखल न घेता थेट कारवाई सुरू केली. परंतु शेवटी पालकमंत्री व शिक्षण विभागाच्या दणक्याने व्यवस्थापनाद्वारे काही अवधीतच ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले. या प्रकारामुळे पालकांना मानसिक त्रास झाला. मात्र आता शिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण