शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: February 9, 2015 23:10 IST

येथील जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत

चंद्रपूर : येथील जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नागरिकांना भुलविणारी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुनीता लोढिया, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर विधानसभेचे उमेदवार महेश मेंढे, वरोरा विधानसभेचे उमेदवार डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, आबीद अली यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज त्वरित सुरु करावे, कर्मचाऱ्यांचा बंद केलेला नक्षलग्रस्त भत्ता चालु करावा, मुस्लीम समाज आरक्षण त्वरित द्यावे, केंद्र सरकारने ओबीसी शिष्यवृत्ती द्यावी आणि क्रिमीनियरची मर्यादा वाढवावी, चंद्रपूर महानगर हद्दीतील ८० हजार घरांपैकी केवळ ३० हजार घरांना शुद्ध पाणी पुरवठा होतो. उर्वरित ५० हजार घरांना नवीन पाणी पुरवठा योजनाचा डीपीआर तयार करून शासनाकडे मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून द्यावा, चंद्रपूर जिल्ह्यातील ३४ खाणीतून होणाऱ्या कोळसा आवंटन रद्द करण्याकरिता सीबीआय चौकशी करण्यात यावी व राष्ट्रीय हरित लवादा नुसार खुल्या प्लॉटवर कोळशाची विक्री करता येत नाही तसेच ओवरलोड ट्रक व बगर ताडपत्री टाकून ट्रक चालवणे बंधनकारक असतानाही खुले आम वाहतूक केली जात आहे यावर निर्बंध आणाला. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केली. (नगर प्रतिनिधी)