मुंगोली-घुग्घुस मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:41+5:302021-04-11T04:27:41+5:30

सदर रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबविण्याची मागणी नकोडा ग्रामपंचायतने एसीसी व घुग्घुस पोलिसांकडे वारंवार केली असली तरी, पोलीस ...

Stop coal transport on Mungoli-Ghughhus route | मुंगोली-घुग्घुस मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक थांबवा

मुंगोली-घुग्घुस मार्गावरून होणारी कोळसा वाहतूक थांबवा

सदर रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबविण्याची मागणी नकोडा ग्रामपंचायतने एसीसी व घुग्घुस पोलिसांकडे वारंवार केली असली तरी, पोलीस मागणीची दखल घेत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

वेकोलिच्या मुंगोली, पैनगंगा, कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी मुंगोली वर्धा नदी पुलावरून नकोडा गावाच्या पूर्व दिशेकडून घुग्घुस, चंद्रपूर, वणीकडे जाण्याचा मार्ग आहे. तर दुसरा मार्ग उसगाव, शेणगाव मार्ग चंद्रपूर महामार्गाला जोडल्या गेला. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्या रस्त्याचा उपयोग न करता माऊंट कार्मेल व नकोडा गावाच्या एसीसी सुरक्षा भिंतीच्या बाजूने असलेल्या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने माऊंट कार्मेल शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा फटका बसत आहे. यासोबतच नकोडा गावातील लोक वसाहतीतही कोळशाची धूळ येत आहे.

Web Title: Stop coal transport on Mungoli-Ghughhus route