शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही पहाडावर लालपरीचे दर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन १८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र तालुक्यातील समस्या तर सोडाच साधी शासनाची लालपरी बहुतांश गावात अजूनही धावली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबससेवा बंदच : परिवहन महामंडळाकडूनही जिवती तालुक्याची उपेक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यात शिथिलता दिल्यानंतर बंद असलेल्या लालपरीची चाकं फिरु लागली. आता जिल्ह्याबाहेरही ही बस जात आहे. मात्र अतिदुर्गम जिवती तालुक्यात अजूनही लालपरीचे दर्शन झालेले नाही. प्रवाशांना मिळेल त्या वाहनात शासन नियमाला बगल देत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने जिवती तालुक्यातही बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन १८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र तालुक्यातील समस्या तर सोडाच साधी शासनाची लालपरी बहुतांश गावात अजूनही धावली नसल्याचे चित्र आहे. ज्या गावात बस सुरू होती, तीसुध्दा कोरोना महामारीच्या काळात बंद केली आहे. सध्या तालुक्यात राजुरा-परमडोली ही ११ वाजताची एकच बस सुरू असल्याने नागरिकांना प्रवास करताना नाईलाजास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवित असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

टॅग्स :state transportएसटी