शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांनी उचलले पाऊल; निजाम स्टेट भारतात विलीन

By admin | Updated: October 31, 2015 01:59 IST

भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, ...

वर्धा नदीच्या दुधोली रेल्वे पुलावर : झाली होती युद्ध सदृष्य कारवाईवसंत खेडेकर बल्लारपूरभारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, वा नाही, हे माहित नाही. पण, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील विखरुन असलेल्या सर्वच लहान मोठ्या संस्थानिकांना भारतात विलीन करून अखंड भारत करण्याकरीता त्यांनी उघडलेल्या मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांनी दिलेला कठोर आणि निर्णायक आदेश या भागात अमलात आला. गृहमंत्रालयाने केलेली बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील दुधोली रेल्वे पुलावरील पोलीस अ‍ॅक्शन यशस्वी झाली आणि निजाम स्टेट भारतात विलीन झाले. त्यामसयी भारत आणि निजाम स्टेटच्या सीमावर्ती भागात काय म्हणून आनंद झाला! त्याचे वर्णन तो आनंद बघणारे, प्रत्यक्ष अनुभव घेणारे सांगतात.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजाम स्टेट भारताशी तुटून होता. निजाम आपल्या स्टेटला भारताचा भाग मानतच नव्हता. त्याचा विचार स्वतंत्र राहायचे वा आपल्या स्टेटला पाकिस्तानशी जोडायचे, असा होता. यामुळे निजाम स्टेट आणि भारत ही दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत, असा व्यवहार या दोहोंच्या सीमेवर चालायचा. वर्धा नदीच्या अलिकडील बल्लारपूर हे शहर भारतात, तर नदीपलीकडील राजुरा हे निजाम स्टेटमध्ये अशी स्थिती होती. निजाम आणि भारताला वाहतुकीने जोडणारा विदर्भ भागात दुधोली हा रेल्वे पूल होता. दोनही भागात वेगवेगळ्या देशांप्रमाणे सीमेवर गाड्यांची तपासणी व्हायची. नियामावर त्याचे विलीनीकरण भारतात करण्याची कारवाई होण्याच्या काही दिवसांपूर्वी पासून भारतीय सैन्यानी जमवाजमव बल्लारपूर आणि दुधोली पुलाजवळ नदीकाठी झाली. सैन्य छावणी उभारली गेली होती. पावसाचे दिवस असल्याने नदीचे पाणी पिण्या योग्य नव्हते. त्यामुळे जवानांकरिता बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन गाडीने पाणी पोहचविले जायचे. सप्टेंबरचा महिना, गणेशोत्सव सुरू होता. निजामाविरुद्ध पोलीस कारवाई (पोलीस अ‍ॅक्शन असे या कारवाईचे नाव) करण्याचा निर्णय झाला. निजामाकडे रजाकार नावाचे सैन्य होते. त्यांनी सीमावर्ती भागात बराच उत्पाद मांडला होता. ते सीमेवर पहारा देत. कारवाईच्या दिनी रेल्वे पुलावर रेल्वे मालगाडीचा आडोसा घेत भारतीय जवानांनी चाल करायचे असे ठरले. त्यानुसार मालगाडीच्या चाकांसह भारतीय जवान पुलावरुन निजामच्या दिशेने हळूहळू सरकू लागले. ही बाब पलिकडील रजाकारांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीच्या इंजीनच्या दिशेने गोळ्या झाडणे सुरू केले. या गोळ्यांच्या माऱ्याने गाडीचा ड्रायव्हर घाबरला आणि विचलीत होऊन गाडी मागे घेऊ लागला. ही बाब लक्षात येताच दुसऱ्या ड्रायव्हरने त्याला बाजून करुन इंजीनचा ताबा घेतला आणि मोठ्या हिंमतीने रजाकारांच्या फैरी समोरुन सुरू असतानाही इंजीनला पुढे नेते. पूल पार केल्यानंतर व निजामाच्या हद्दीत पोहचल्यानंतर भारतीय जवान रजाकांवर तुटून पडले आणि पुढे पुढे सरकत जात मोहिम यशस्वी झाली. अशाप्रकारे निजाम भारतात विलीन झाले. सरदार पटेल यांचे कठोर पाऊल उचलून निजामला भारतात विलीन केले. तसे झाले नसते तर बल्लारपूर- राजुरा भागात वेगळीच स्थिती राहिली असती. म्हणूनच सरदार पटेल यांचे आभार मानावे तेवढे कमीच !