शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

केबलच्या खोदकामामुळे राज्य मार्गाची दुरवस्था

By admin | Updated: June 17, 2015 01:56 IST

मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला

बल्लारपूर : मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम सुरू आहे. यामुळे राज्य महामार्गाची दुरवस्था होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बल्लारपूर शहरातील रस्त्याच्या बाजुला खड्डे निर्माण झाले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वनविभागाच्या झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमापासून गोंडपिपरीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने चंद्रपूर येथील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून एअरटेल कंपनीच्या भूमीगत केबल लाईनसाठी खोदकाम केले जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र खोदकाम करण्यासाठी पूर्व परवानगी घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. परिणामी चौपदरी रस्त्याच्या एका बाजूला खड्डे निर्माण झाले आहेत. बल्लारपूर शहरात तर ऐन रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. परिणामी रस्त्याच्या बाजूला असणारे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.बामणी (दुधोली) ते चंद्रपूर दरम्यान मार्गाचे चौपदीरकरण करण्यात आले. या मार्गावर एकेरी वाहतूक सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. अशातच केबलच्या खोदकामामुळे चांगल्या मार्गाचे विद्रुपीकरण करण्याचे धोरण केबल व्यवस्थापनाकडून केले जात आहे. परिणामी शहरातील मार्गावर खड्डे निर्माण होऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर बहुतेक ठिकाणी जंगलव्याप्त भाग आहे. वृक्षाचे जतन करणे महत्त्वाचे असूनही केबलच्या खोदकामासाठी रस्त्यालगतच्या झाडाची सर्रास कत्तल केल्याचे दिसून येते.दूरसंचार सेवा कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी वनविभागाला व सार्वजनिक बांधकाम विभागालाच एअरटेल कंपनीच्या व्यवस्थापनाने वेठीस धरल्याचे दिसते. यामुळे केबलच्या अनाधिकृत खोदकामाकडे वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांचे खोदकामावर नियंत्रण नसल्याने संबंधित कंत्राटदार नियमाला डावलून काम करीत आहे. केबलच्या खोदकामामुळे प्राणहाणी झाल्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. सदर खोदकामाला अनाधिकृतपणे संमती देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)वाहतुकीस अडथळा४रस्त्याच्या लगत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यालगतची माती डांबरीकणावर पसरत आहे. त्यामुळे रस्त्यावर बारीक माती साचून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.