शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील गटबाजीवर प्रदेश काँग्रेसचे लक्ष

By admin | Updated: October 27, 2014 22:32 IST

महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक

चंद्रपूर : महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी मंत्री नितीन राऊत २८ आॅक्टोबरला चंंद्रपुरात येत आहेत.प्र्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनपा महापौर निवडणूक निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी दुपारी त्यांनी मनपातील महापौर संगीता अमृतकर, गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक प्रशांत दानव, आणि महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती जाणून घेतली. २८ तारखेला आपण चंद्रपुरात येणार असल्याचे त्यांनी या सर्वांना कळविले असून विश्रामगृहात दुपारी ३ वाजता भेटीसाठी पाचारण केले आहे.चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये तीन गट स्पष्ट दिसत आहेत. त्यातील नरेश पुगलिया आणि नंदू नागरकर यांच्या गटाने सामंजस्य दाखवित एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापौरांच्या गटाने आपली वेगळी चुल कायम ठेवली असून या निवडणुकीसाठी भाजपाची मदत मागितली आहे. राज्यात ज्या भाजपाने काँग्रेसचा सफाया केला, त्यांच्याकडून महापौरपदाच्या निवडणुकीसाठी या गटाने मदत मागितल्याने प्रदेश काँग्रेस कमेटीनेही याची दखल घेतल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमिवर पक्षाचे निवडणूक निरीक्षक मंगळवारी चंद्रपुरात येत असल्याने ते काय संदेश देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)