शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

इरई पुनरूज्जीवनाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: April 9, 2016 01:29 IST

चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम वित्तमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे.

८४ कोटींचा खर्च : सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कामाला शुभारंभचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम वित्तमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दाताळा गावाकडे जाणाऱ्या इरई नदीवरील पुलाशेजारी या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३१ जानेवारीला झालेल्या जलपरिषदेदरम्यान जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांना त्यांनी यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. डॉ. सिंह यांनी यात लक्ष देण्याबाबत ना. मुनगंटीवार यांना आश्वस्त केले आहे.त्यानुसार हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कामाकरिता अंदाजे ८४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांकरिता तांत्रिक सल्लागार नेमला जाणार आहे. शहरालगतच्या नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामासाठी वेकोलिने निधी दिला असून त्यानुसार पडोली पुल ते चोराळा पुलापर्यंत गाळ काढण्याच्या कामाला यापूर्वीच सुरूवात करण्यात आलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)