शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वारसा असूनही नागभीड तालुका पर्यटनात मागेच

By admin | Updated: September 30, 2015 01:36 IST

एखाद्या तालुक्याच्या विकासात पर्यटनाचा फार मोठा वाटा असतो. नशिबाने नागभीड तालुक्याला पर्यटनाचा फार मोठा वारसा

-घनश्याम नवघडे ल्ल नागभीडएखाद्या तालुक्याच्या विकासात पर्यटनाचा फार मोठा वाटा असतो. नशिबाने नागभीड तालुक्याला पर्यटनाचा फार मोठा वारसा आहे. पण या पर्यटनस्थळाच्या विकासाची जबाबदारी कोणीच उचलत नसल्याने हे पर्यटन स्थळ जैसे थे आहेत.नागभीड तालुक्यात घोडाझरी, नागभीड येथील शिवटेकडी, मोहाळी येथील पांडव गुफा, बाळापूर येथील गायमुख, गोविंदपूर येथील सात बहिणींचे डोंगर आदी पर्यटनस्थळे आहेत. घोडाझरी येथे तर बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातून पर्यटक नेहमीच येथे येत असतात.घोडाझरी सारखा निसर्गरम्य परिसर पूर्व विदर्भात दुसरा नाही. पण या स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने शासन कोणतेच प्लॅनिंग करीत नाही. येथे वर्षभर गर्दी होत असली तरी पर्यटकांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे सकाळी घोडाझरीत आलेल्या पर्यटकाला सायंकाळी इच्छा नसुनही परत जावे लागते. या ठिकाणी सुसज्ज कॉटेजची नितांत गरज आहे.१०७ वर्षापूर्वी इंग्रजांनी येथे एक विश्रामगृह बांधले होते. ते आता पार मोडकळीस आले आहे. या विश्रामगृहाची साधी डागडुजीसुद्धा गेल्या अनेक वर्षात झाली नाही हे खरोखरच घोडाझरीचे दुर्दैव म्हणावे लागेल. घोडाझरी सोबतच नागभीड येथील शिवटेकडीसुद्धा एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. येथील मॉर्निंग वॉक या संघटनेने लोकसहभागातून लाखो रुपयांची कामे केली आणि शिवटेकडीच्या विकासात भर घातली असली तरी शासनस्तरावर जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, ते मात्र शिवटेकडी संदर्भात होताना दिसत नाही. नागभीड तालुक्यातच बाळापूरजवळ गायमुख हे तीर्थक्षेत्र आहे. भूगर्भातून अव्याहत पाण्याचा झरा वाहत असल्याने या स्थळाला गायमुख हे नाव पडले आहे. बाळापूर येथील एका कुटुंबाकडे या स्थळाची मालकी असल्याने या स्थळाचा विकासच झाला नाही. याच गोष्टी गोविंदपूर जवळील सातबहिणीच्या डोंगराला आणि मोहाळाजवळच्या पांडव गुंफेला लागू पडतात. मोहाळी येथील पांडव लेणी तर रामायणकालीन आहेत. राजकारण्यांची अनास्थायेथे पांडव वनवासात असताना मुक्कामी होते अशी आख्यायिका आहे. पण या स्थळाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नाही ही या स्थळाची शोकांतिका आहे.सध्या महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी याबाबींचा पाठपुरावा केला तर नागभीड तालुक्यातील पर्यटनाच्या विकासात निश्चितच भर पडू शकते.