शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिभावाने न्हाऊन निघाला गजाननभक्तांचा अध्यात्मिक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

'जय गजानन' लिहिलेली टोपी घातलेली मंडळी प्रत्येकाजवळ जाऊन 'माऊली' अशी हाक देत सन्मानाने कार्यक्रमस्थळी नेत होते. कार्यक्रमस्थळी गजानन महाराजांची मूर्ती पाहून येणाऱ्या प्रत्येक भक्तांनाही परिसरात येताच माऊलीचा वास असल्याचा भास होत होता. अशा भक्तिमय वातावरणाने श्री संत गजानन महाराज यांचा अध्यात्मिक सोहळा न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देश्री संत गजानन गौरव गाथा समितीचा सतत दुसरा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जय गजानन...गजानन महाराज की जय...गण गण गणात बोते...चा गजर. प्रत्येक भक्तांमध्ये माऊलीचा वास आहे ही भावना मनात साठवून डोक्यावर 'जय गजानन' लिहिलेली टोपी घातलेली मंडळी प्रत्येकाजवळ जाऊन 'माऊली' अशी हाक देत सन्मानाने कार्यक्रमस्थळी नेत होते. कार्यक्रमस्थळी गजानन महाराजांची मूर्ती पाहून येणाऱ्या प्रत्येक भक्तांनाही परिसरात येताच माऊलीचा वास असल्याचा भास होत होता. अशा भक्तिमय वातावरणाने श्री संत गजानन महाराज यांचा अध्यात्मिक सोहळा न्हाऊन निघाला.श्री संत गजानन गौरव गाथा समितीच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात रविवारी सायंकाळी हा अध्यात्मिक सोहळा पार पडला. माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व महापौर राखी कंचर्लावार, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे हे या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.या सोहळ्याचे प्रास्ताविक श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी तर संचालन मंजुषा रवींद्र अडावतकर यांनी केले.गजनान भक्तांसाठीचा हा अध्यात्मिक सोहळा घडवून आणण्यासाठी श्री संत गजानन गौरव गाथा समिती सचिव पी. आर. देशमुख, उपाध्यक्ष संजय जगशेट्टीवार, राजेंद्र तुम्मेवार, प्रसिद्धी प्रमुख किशोर बोधे, संदीप देशपांडे, कोषाध्यक्ष अविनाश उत्तरवार, अतुल सकदेव, समीर तातावार, विवेक मामीडवार, विलास कोहळे, बंडू पोटे, दिगांबर इंगळे, महेश पिंपळशेंडे, किशोर गोगुलवार, डॉ. कुळकर्णी, क्रिष्णकांत पोद्दार, अभिजित मोहगावकर, पंकज देशमुख, प्रिया धिरज चौधरी, सुनंदा चिंतावार, वृंदा मामीडवार, छबुताई वैरागडे, भाटीया आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६.३० वाजताची होती. मात्र गजानन भक्तांनी ५ वाजतापासूनच हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ असताना सभागृह गजानन भक्तांनी खचाखच भरले होते. याची चाहूल श्री संत गजानन गौरव गाथा समितीला अगोदरच लागली होती म्हणूनच की काय आयोजकांनी एकही गजानन भक्त गजानन महाराज यांच्या गौरव गाथा ऐकण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सभागृहाच्या आवारात स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पाहता पाहता या आवारातील खुच्यार्ही गजानन भक्तांच्या उपस्थितीने कमी पडत होत्या. मात्र याची कमतरता आयोजकांनी जाणवू दिली नाही. कार्यक्रमानंतर महाराजांच्या आवडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असे असताना आयोजन समिती सदस्य महाप्रसादाला उशीर लागेल असे सांगून प्रत्येकाजवळ चहा बिस्कीट घेऊन जात महाप्रसादाला उशीर लागेल असे म्हणत सेवा देत होते. अध्यात्मिक सोहळा कसा असावा याची प्रचिती याप्रसंगी आल्यावाचून राहिली नाही. या सोहळ्याचा समारोप महाजारांना प्रिय असलेल्या महाप्रसादाने करण्यात आला.एकदा तरी आम्हास भेट रे गजानना...अकोला येथील गजानन भक्त सुनील देशपांडे हे माऊलीचे विचार, अध्यात्म आणि महाराजांचे त्या काळातील निस्सिम भक्त व माऊलींचे परस्पर संबंध तसेच त्यांची कृपा करण्याची पद्धत व भक्तांसाठी दिलेले अध्यात्मिक ज्ञान यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, महाराजांवरील ‘नित्यनाम स्मरणे पावे गजानन...भक्त रक्षणास नित्य धावे गजानन...’, ‘पाणावले डोळे दाटे गहिवर...देव उघडते वैकुंठाचे दार...’ या भजनांनी गजानन भक्त न्हाऊन निघाले. अध्यात्मिक सोहळ्याचा शेवट ‘अंतरी फिरून ये उचंबळूनी प्रार्थना...एकदा तरी आम्हास भेट रे गजानना...’ या भजनाने झाला. यावेळी उपस्थित गजाजन भक्तांचे डोळे पाणावले होते. मूल येथील चंदू पाटील मारकवार यांनी माऊलीच्या विचारावर ग्रामविकास साधला, यावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Socialसामाजिक