शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आटोपताच जिल्हा परिषदेत रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत फारसे लक्ष नव्हते. आता मात्र नागरिकांसह कर्मचाऱ्यांची एकच गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देकामकाज सुरू : पदाधिकारी-अधिकाऱ्यांची वाहने पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदकडे बहुतांश पदाधिकारी फिरकलेच नव्हते. तर अधिकारी- कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजांवर परिणाम झाला होता. जवळपास महिनाभर जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प असल्यागत स्थिती होती. बुधवारपासून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरु केले. नागरिकांनीही विविध कामांसाठी गर्दी केली. तर पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे वाहने परत मिळाली.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत फारसे लक्ष नव्हते. आता मात्र नागरिकांसह कर्मचाऱ्यांची एकच गर्दी दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील ६० टक्के अधिकारी- कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले होते. उर्वरित कर्मचाऱ्यांना निमित्त मिळाल्यामुळे त्यांच्याकडून फारशी कामे झाली नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती. सुटी संपल्यामुळे आता जिल्हा परिषदकडे कर्मचारी वळले असून नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.कंत्राटदारांची गर्दी वाढलीविधानसभा निवडणुच्या आचारसंहितेमुळे कंत्राटदारांची अनेक बिले आचारसंहितेपूर्वी काढण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काहींचे बिल अडली होती. आता पुन्हा बिले काढण्यासाठी कंत्राटदारांनी प्रयत्न सुरु केले असून प्रत्येक विभागामध्ये कंत्राटदारांची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र काही विभागप्रमुख अद्यापही सुटीवर असल्याने ते आल्यानंतर त्यांचे बिले मंजूर होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद