शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन

By admin | Updated: March 21, 2016 00:44 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सर्वांगीण शैक्षणिक, गुणवत्ता विकास कार्यक्रम यासारखे उपक्रम राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ...

शिक्षक संघाचा इशारा : शिक्षण विभागाचे दुर्लक्षगोंडपिपरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सर्वांगीण शैक्षणिक, गुणवत्ता विकास कार्यक्रम यासारखे उपक्रम राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत तत्पर असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवर गोंडपिपरी शिक्षण विभागाच्या वतीने अन्याय केला जात आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. शासन निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी समस्या निवारण सभा घेणे अनिवार्य आहे. परंतु सत्र संपत असतानासुद्धा समस्या निवारण सभा घेण्यात आली नाही. असे असतानाही अखिल गोंडपिपरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वारंवार निवेदन देवून समस्या निवारण सभा घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात यावे, अशी जाणीव करून दिल्यानंतरही पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ केली जात आहे, निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे. याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांकडे उडवाउडवीचे व बेताल उत्तर दिले जात आहे. ही शिक्षण विभागाची शोकांतिका आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी कुंभकर्णाची झोप घेत असल्याने तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांचा ढीग साचला आहे. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा निवेदनातून दिला आहे. संवर्ग विकास अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत दखल घेऊन त्या निकाली काढण्यात व भविष्यात होणाऱ्या स्फोटक परिस्थितीला टाळावे, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशारा निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)