शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी जंगलात सौर हातपंप

By admin | Updated: May 30, 2015 01:31 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने नाले, पाणवठे, बंधारे यात पाणी नसते. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांना इतरत्र भटकंती करावी लागते.

मूल बफर झोन क्षेत्र : वनविभागाचा उपक्रम राजू गेडाम  मूलउन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने नाले, पाणवठे, बंधारे यात पाणी नसते. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांना इतरत्र भटकंती करावी लागते. जंगलात वीज नसल्याने मोटारपंप लावणे कठीण होत असते. हे हेरून सूर्यप्रकाशावर चालणारे सौर ऊर्जा हातपंप उभारण्याचा उपक्रम मूल बफर झोन परिक्षेत्रात राबविण्यात आला आहे. मूल वनपरिक्षेत्रातील जानाळा व डोनी या जंगलव्याप्त परिसरात सौर उर्जापंप उभारल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असते. जंगलव्याप्त परिसरात पाण्यासाठी मोटार पंप लावणे आवश्यक असते. पाण्यासाठी वन्यप्राणी गावाकडे कूच करताना आढळतात तर केव्हा पाण्यासाठी भटकता भटकता शिकारी आपल्या जाळ्यात ओढून घेत असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होता कामा नये यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन परिक्षेत्रातील जानाळा कक्ष क्र. ३५३ व डोनी कक्ष क्र. ३२७ येथे सौर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले आहे. एका पंपासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी जवळपास १ लाख ८५ हजार रुपये खर्च आहे. जानाळा आणि डोनी या जंगलव्याप्त परिसरात सौरउर्जेवर चालणारे हातपंप लावल्याने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नियमीत पाणी येत असून जवळपास असणारे डबके, नाले, पाणवठे पाण्यानी भरले जात आहे. नियमित केलेल्या निरीक्षणातून सदर डबक्यातील पाण्याजवळ वाघ, रानगवे, अस्वल, सांबार, हरिण, आदी हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळल्याचे वनअधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जानाळा व डोनी परिसरात सौर उर्जेवर चालणारे हातपंप लावण्यात आले ही बाब वन्यप्राण्यांसाठी दिलासा देणारी आहे. मात्र वनविभागाची तेवढीच जबाबदारीसुद्धा वाढली आहे. या परिसरात वन्यप्राणी असतात, हे हेरून शिकारी शिकारीसाठी येण्याची शक्यता बळावली आहे. तसेच अवैध वृक्षतोड करणारे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यास वन्यप्राण्यांना पाणी मिळणार नाही. यासाठी वेळोवेळी वनविभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.- उमेश झिरे,पर्यावरण मित्र मूलपरिक्षेत्रातील जानाळा व डोनी परिसरात सौर ऊर्जेवर चालणारे सौरपंप लावलेल्या ठिकाणी नेहमी वनमजूर जात असून वेळोवेळी पाहणी करीत असतात. वन्यप्राण्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. वनरक्षक व आपण सुद्धा वेळेवेळी भेट देऊन आढावा घेतला जात आहे. - ओमप्रकाश पेंदोर,वनपरिक्षेत्र अधिकारी मूल