नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:51+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला.

Soil mining is done through river basins | नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

Next
ठळक मुद्देउमा नदीचे नैसर्गिक पात्र संपुष्टात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सदर कामासाठी रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, डोंगरगांव ते रत्नापूर या रस्त्याचे तसेच उमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. याच पुलाजवळ माती तस्करांनी मोठमोठे खड्डे करून तस्करी सुरु केली आहे. यामध्ये शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रातील खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.
मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. या कामाला सुरुवात झाली असून नदीवरील पुलाचे पिल्लरसुद्धा उभे झाले आहे.
मात्र सदर कामाच्या बाजुने नदीपात्रातून पोकलॅन्डव्दारे मोठ्या प्रमाणात मातीचे खनन केले जात आहे. त्यामुळे पात्रामध्ये ७ ते ८ फुट खोल खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खनन प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हामहासचिव राकेश रत्नावर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

अपघात झाल्यास जबाबदार कोण
मौजा डोंगरगांव येथील नदीघाटावरून मातीचे खनन केल्या जात असल्यामुळे काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्यात सदर खड्डे पाण्याने भरतील त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण जाणार आहे. परिणामी एखाद्यावेळी अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याच्या काही अंतरावरच स्मशानभुमी आहे. येथे मोठ्या संख्यने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेकडो ब्रास मातीची चोरी
पोकलॅन्डच्या माध्यमातुन नदीतून मातीचे खनन केले जात आहे. हायवाद्वारे ही माती इतरत्र नेली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे दिसत आहे.

डोंगरगांव-रत्नापूर मार्गावरील नदीपात्रातील मातीच्या खननाबाबत पथकाद्वारे चौकशी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास खनन करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- डी. जी. जाधव, तहसीलदार, मूल

Web Title: Soil mining is done through river basins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी