जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ८१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST2021-07-09T04:19:11+5:302021-07-09T04:19:11+5:30

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ११, भद्रावती १, बल्लारपूर ३, वरोरा २ व ...

So far 83 thousand 81 corona free in the district | जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ८१ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ८१ कोरोनामुक्त

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ११, भद्रावती १, बल्लारपूर ३, वरोरा २ व राजुरा येथील एकाचा समावेश आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, कोरपना व जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील एका महिलेचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ७८६ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ८१ झाली आहे. सध्या १७२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ७४ हजार ६६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ८६ हजार ९९४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: So far 83 thousand 81 corona free in the district