शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

ध्रूम्रपान करणाऱ्यांवरही होणार कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने पूर्ण केले. यासाठी पोलीस पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेखर देशमुख (गृह ) उपधीक्षक, पोलीस सारथी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. टी. एकुरके .....

ठळक मुद्देसंडे अँकर । पोलीस प्रशासन, कोटपा कायद्याबाबत कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्रास होणारे धूम्रपान आणि तंबाखू खर्रा सेवनाचे वाढते व्यसन आरोग्याला घातक आहे. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली आता तंबाखुविरोधी कोटपा कायद्यानुसार कडक कारवाईची मोहीम सुरू केले जाणार आहे. संबंध हेल्थ फाऊंडेशन आणि चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या माध्यमातुन यासाठी नुकतेच प्रशिक्षण व कृती कार्यक्रम आखण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने पूर्ण केले. यासाठी पोलीस पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेखर देशमुख (गृह ) उपधीक्षक, पोलीस सारथी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. टी. एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशन आणि चंद्र्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनतर्फे कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रणव इंगोले यांनी तंबाखूमुळे होणाºया आजाराबत आणि त्याच्या परिणामाबाबत शास्त्रीय माहिती दिली.कोटपा-२००३ कायदा म्हणजे काय ?सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कलम- ६ (ब ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बाल न्याय कायदा कलम-७७ नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख व आणि ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.नागरिकांनी सहकार्य करावेसार्वजनिक धूम्रपान व शाळा- कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाºयांवर येत्या काही दिवसांत धडक कारवाई केली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयात शिकणारी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी शिक्षक, पालक, सामाजिक संघटना, महिला बचतगट क्रीडा मंडळे आदींनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस