शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खनन प्रकरणी दोन हॉयवासह सहा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होता. याबाबत येथील तहसील कार्यालयामध्ये काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी या तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरु केले.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरु आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी कठोर कारवाई करीत दोन हायवा ट्रकसह सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली. आता या तस्करांवर नजर ठेवण्यासाठी एक पथक गठित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एका नायब तहसीलदारांना रेती तस्करांनी दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होता. याबाबत येथील तहसील कार्यालयामध्ये काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी या तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरु केले. याचाच एक भाग म्हणून घुग्घूस परिसरातून रेती तस्करी करताना दोन हॉयवा तसेच चंद्रपूर येथून सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यातील काही वाहनमालकांकडून दंड वसुल करण्यात आला तर काहींना नोटीस पाठविण्यात आला आहे. रेती तस्करी थांबण्यासाठी तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यासह सहा तलाठ्यांचे एक पथक गठित केले असून या पथकाच्या माध्यमातून रेती तस्करांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. सदर पथक येथील इरई नदी तसेच परिसरातील नदी, नाल्यांवर लक्ष ठेवून आहे.तस्करांची माहिती द्याचंद्रपूर शहरात रेती तस्करी होत असल्यास त्यासंदर्भात तहसील कार्यालयात माहिती द्या, अशआ रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे आवाहन येथील तहसीलदार निलेश गौंड यांनी केले आहे.

टॅग्स :sandवाळू