शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 10, 2014 23:32 IST

आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प

पाणी प्रश्न तूर्तास टळला : चार दिवसांच्या पावसाने सावरलेचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाची चिंता तूर्तास टळली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी करून चंद्रपूर जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या वरूणराजाने यावर्षी पावसाळाभर शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच पाऊस पडला. तोही समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यानंतर आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह नव्हती. त्यामुळे एरवी या कालावधीत तुडूंब भरली असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात आॅगस्ट महिन्यात निम्माही जलसाठा नव्हता. परिणामी जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले होते. उन्हाळाभर पाणी टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, असा बिकट प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस कायम राहिला. त्यामुळे चिंताजनक स्थितीतील जलाशयांना अचानक नवसंजीवनी मिळाली. इरई धरणासह सहा प्रकल्प १०० टक्के भरले. इरई धरणातून सुरक्षेसाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतरही ९३.७७ टक्के पाणी आहे. नलेश्वर प्रकल्प, चंदई प्रकल्प, चारगाव प्रकल्प, लभानसराड व दिना प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर आसोलामेंढा प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात ८१.४२ टक्के जलसाठा आहे. याशिवाय घोडाझरी ५५.१३ टक्के, अमलनाला ६७.८६ टक्के, पकडीगुड्डम ५५.०१ टक्के व डोंगरगाव प्रकल्प ७७.७९ टक्के भरला आहे. याशिवाय नदी-नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने तुर्तास जिल्ह्यावर घोंघावणारे पाणी संकट दूर झाले आहे.(शहर प्रतिनिधी)