गत २४ तासात सहा कोरोनामुक्त ; चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:06+5:302021-02-08T04:25:06+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ...

Six corona free in last 24 hours; Four positives | गत २४ तासात सहा कोरोनामुक्त ; चार पॉझिटिव्ह

गत २४ तासात सहा कोरोनामुक्त ; चार पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर चार कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २३ हजार १३६ झाली असून, त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६४६ झाली आहे. सध्या ९८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख तीन हजार ५०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ७८ हजार २८५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एक, चंद्रपूर तालुक्यात एक, भद्रावती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Six corona free in last 24 hours; Four positives