शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

साहेब, मेडिकलमध्ये औषधे आणायला चाललोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 5:00 AM

शनिवारी व रविवारी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अत्यावश्यक सेवेची दुकाने, मेडिकल, हास्पिटल सुरू होती; तर चौका-चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत होते. मनपाचे पथकही विनामास्क घालून फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावत होते. पोलिसांचे पथक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी करीत होते. ज्याच्याकडे ठोस कारण नाहीत, अशांवर दंड ठोठावत होते.

ठळक मुद्देवीकेंड लॉकडाऊन : दोन दिवसांत ४८ हजार ७०० रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘बेक्र द चेन’अंतर्गत शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, या काळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांची शहरातील चौका-चौकात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी बहुतांश जणांनी साहेब, मी रुग्णालयात जातो, तर काहींनी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात असल्याची बतावणी केली. शनिवारी व रविवारी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अत्यावश्यक सेवेची दुकाने, मेडिकल, हास्पिटल सुरू होती; तर चौका-चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत होते. मनपाचे पथकही विनामास्क घालून फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावत होते. पोलिसांचे पथक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी करीत होते. ज्याच्याकडे ठोस कारण नाहीत, अशांवर दंड ठोठावत होते. दोन दिवसांत पोलिसांनी ४८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या प्रसादासोबतच दंडही भरावा लागला. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासन कसून प्रयत्न करीत आहे. मात्र काही बेफिकीर प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शनिवारी झालेली कारवाईचंद्रपूर शहरात चौका-चौकात पोलीस तपासणी करीत होते. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या सुमारे ८२ जणांवर कारवाई करून २० हजार ८०० रुपयांदा दंड ठोठावण्यात आला. 

रविवारी झालेली कारवाईवीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे रविवारी पोलिसांनी तपास मोहीम कडक केली होती. रविवारी १३१ जणांवर कारवाई करून २७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. 

बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच वीकेंड लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी पोलीस प्रशासनाकडून केल्यानंतर सर्वांची कारणे सारखीच आढळून आली. अनेकांनी रुग्णालयात डबा घेऊन चाललोय, औषधे आणायला मेडिकलमध्ये चाललोय, किराणा साहित्य आणण्यासाठी चाललोय, अशी कारणे पोलिसांना सांगितली

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस