शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या.

ठळक मुद्देमनपाचा निर्णय ठरला वादग्रस्त । भरलाच नाही गंज वार्डातील भाजीबाजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गंज वार्डातील किरकोळ भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कोहीनुर तलावात बाजार भरविण्याचा निर्णय मनपाने शुक्रवारी घेतला होता. मात्र, तापत्या उन्हात व्यावसायिकांसाठी कुठलीही व्यवस्था नसल्याच्या कारणावरून व्यावसायिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे मनपाचा निर्णय वादग्रस्त ठरला असून भाजीबाजारच भरला नाही. शहरातील शेकडो नागरिकांना भाजीपाल्याविना घरी परत जावे लागले.शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या. केवळ लिलाव करणाºयाना गाळेधारकांना विक्रेत्यांनाच सकाळी ९ वाजतापर्यंत गंजवार्डात व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली. मात्र, किरकोळ भाजीपाला विकता येणार नाही, अशा सूचना दिल्या. परंतु, किरकोळ विक्रेते माल उचलणार की नाही, या भीतीने बहुतांश गाळेधारक व्यावसायिकांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारात थोक भाजीपाला खरेदी केला नाही. काही किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी दुकाने लावण्याची तयारी करत असताना मनपा पथकाने ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन गंजवार्डातून हुसकावून लावले. कोहीनुर तलावात जाण्याचे आवाहन केले. परंतु, त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप करून विक्रेते फिरकलेच नाही. दरम्यान, व्यवस्थेच्या कारणावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विक्रेते व मनपा कर्मचाºयांमध्ये धक्काबुक्की झाल्याने भाजी बाजारच भरला नाही. त्यानंतर काही विक्रेत्यांनी रामाळा तलाव परिसरात दुकाने लावल्याचे दिसून आले.हातठेल्यांवरून शहरात भाजीपाला विक्रीगंजवार्डातील भाजीबाजार नियोजित कोहीनुर तलावात न भरल्याने बºयाच किरकोळ विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारातून भाजीपाला खरेदी करून हातठेल्यावरून वार्डावार्डात विक्री करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार