शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीचा शेकडो वीज ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 01:06 IST

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक विद्युत ग्राहक त्रस्त असून....

वीज बिलाची होळी : संतप्त ग्राहकांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक विद्युत ग्राहक त्रस्त असून नादुरस्त विद्युत मीटर व कमी जास्त दाबाचा विद्युत पुरवठा, चुकीचे रीडिंग अशा विविध अडचणींमुळे त्रस्त ग्राहकांनी सोमवारी वरोरा येथे महावितरण कंपनीचा निषेध नोंदवून कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. वीज वापर नसताना सुद्धा मागील दोन महिन्यांपासून मागील बिलापेक्षा २ ते १० पट वीज बील पाठविण्यात आले आहे. यात कोणतीही चूक नसताना शेकडो विद्युत ग्राहकांना भुर्दंड बसला आहे. भारनियमन नसताना सुद्धा सतत विद्युत पुरवठा खंडीत असते. १५ दिवसांपूर्वी सुनील चिचोलकर या शेतकऱ्याने पडलेले खांब हटविण्याची तक्रार देऊन सुद्धा त्यांच्या तक्रारीचे निवारण झाले नाही. त्यामुळे त्यांच्या बैलाला विद्युत झटका लागला तर शेतकऱ्याचाही अपघात झाला. अशा विविध समस्यांचे निवारण करण्याच्या मागणीकरिता सोमवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जैरुद्दिन छोटूभाई, अनिल झोटींग, रणवीर चिंचोलकर , अजय पेचे, विलास पेंदे, सुरज नागभीडकर, बाबा खंडाळकर, विनोद दर्वे, शंकर गेडाम, सुरज खंडाळकर, गुलाब तोडासे, माणिक शेंडे, रघु दडमल आदी उपस्थित होते.