शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

त्या वाघिणीचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

फोटो नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव परिसरातील रत्नापूर बिटामध्ये खांडला गावाजवळ वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस ...

फोटो

नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव परिसरातील रत्नापूर बिटामध्ये खांडला गावाजवळ वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. या वाघिणीचा मृत्यू हा वाहनाची धडक बसल्याने झाला असावा, असा निष्कर्ष शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या चमूने काढला आहे.

रत्नापूर -खांडला या मुख्य रस्त्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृतावस्थेत आढळली होती. दोन -तीन दिवसांपूर्वी वाघिणीघा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. शवविच्छेदनामध्ये तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय मोठया वाहनाची जोरदार धडक बसली असावी, तरीही ती काही अंतर पुढे जाऊन मृत पावली असावी आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या टिमकडून काढण्यात आल्याची माहिती आहे. सदर वाघिणीचे शवविच्छेदन डॉ.पि.आर. खोब्रागडे, डॉ. एस. एस. गव्हारे, डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले. यावेळी वाघिणीचे दात, मिशा, नखे व इतर अवयव शाबूत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे, मानद वन्यजीव संरक्षक बंडु धोतरे व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर उपस्थित होते.

बॉक्स

रेती तस्करीच्या वाहनाची बसली असावी धडक

रत्नापूर-खांडला या रस्त्याने रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत असते. यातील एखाद्या वाहनाची धडक बसली की काय, या दृष्टीने वनविभागाने तपास सुरू केला आहे. रविवारी या संपूर्ण परिसराची वनाधिकाºयांनी पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले आणि त्यांची टिम पुढील तपास करीत आहेत.