शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपूर सोसायटीकडून अजूनही कर्ज वाटप नाही

By admin | Updated: June 21, 2015 01:57 IST

येथे विविध कार्यकारी संस्था असून या संस्थेने आतापर्यंत कर्जाचे वाटप न केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आर्थिक अडचण : बळीराजा झिजवतोयं सोसायटीचे उंबरठेशंकरपूर : येथे विविध कार्यकारी संस्था असून या संस्थेने आतापर्यंत कर्जाचे वाटप न केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. शेतीच्या मशागतीपासून ते बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु शंकरपूर येथील विविध कार्यकारी संस्थेने अद्यापपर्यंत कर्जवाटप न केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दररोज सोसायटीच्या कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहे. कार्यालय बहुतांशी वेळा बंद राहत आहे, तर संबंधित लिपीक कार्यालयात चुकून सापडला तर दोन-तीन दिवसात कर्ज वाटप होईल, असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे. शासनाच्या धोरणानुसार संस्थेतून पहिल्या हफ्त्याचे वाटप १५ मेपर्यंत करणे गरजेचे आहे. परंतु जून महिन्या पंधरवडा संपला तरी कर्जाचे वाटप झाले नाही. या संस्थेत १२२ सभासद आहेत. या सभासदांना दोन कोटी २१ लाख दहा हजार रुपयांचे वाटप करावे लागते. या कर्जाच्या भरवशावरच शेतकरी बि-बियाणे घेत असतात. परंतु वाटपच न झाल्याने शेतकऱ्यांनी बि-बियाणे घेतले नाही. या क्षेत्रात मिरची, सोयाबीन, धान, कापूस ही पिके शेतकरी घेतात.या पिकाचे बि-बियाणे घेण्यासाठी कर्जवाटप होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. शेती हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी बि-बियाण्यांची लागवड करीत आहे. परंतु या १२२ शेतकऱ्यांनी अजुनही बि-बियाणे खरेदी न केल्यामुळे लागवड झाली नाही. या संस्थेवर प्रशासक नेमल्यामुळे या सभासदांचा वाली कोणीच नाही. वरिष्ठ पातळीवर दखल घेवून शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)