शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार शेतकऱ्यांनी विकलाच नाही कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. बाजार समितीच्या वतीने सदर शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला जातो, परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. आता या शेतकऱ्यांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे. 

ठळक मुद्देपणन महासंघाचे केंद्र १६ फेब्रुवारीपासून

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : हमीभावाने पणन महासंघाने राज्यातील अनेक केंद्रावर कापूस खरेदी केला. कापूस खरेदी १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर, या हंगामातील हमीभावाने कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे, पण महासंघाकडे नोंदणी केलेल्या सात हजार शेतकऱ्यांनी  अजूनही कापूस अद्यापही विक्रीकरिता आणलेला नाही.हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. बाजार समितीच्या वतीने सदर शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला जातो, परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. आता या शेतकऱ्यांचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे. उलट खासगी जिनिंगमध्ये २२ हजार ८२३ शेतकऱ्यांनी दोन लाख ९३ हजार क्विंटल कापूस विकला आहे. खासगी जिनिंग व पणन महासंघाच्या दरामध्ये मध्यंतरी अधिक फरक नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जिनिंगमध्ये कापूस विकल्याचे मानले जात आहे. पणन महासंघाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कापूस विकल्याचे दिसून येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपूर्वी स्वामी जिनिंग माडा रोड येथे शेतकऱ्यांनी कापूस विक्री आणावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस