इंधन, महागाई विरोधात शहर जिल्हा काँग्रेसची आंदोलनाची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:22+5:302021-07-08T04:19:22+5:30

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार दि. ९ जुलैला सकाळी ...

A series of agitations by the City District Congress against fuel and inflation | इंधन, महागाई विरोधात शहर जिल्हा काँग्रेसची आंदोलनाची मालिका

इंधन, महागाई विरोधात शहर जिल्हा काँग्रेसची आंदोलनाची मालिका

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार दि. ९ जुलैला सकाळी ११ वाजता शहर महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. शनिवार दि. १० जुलैला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल यात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

रविवार दि. ११ जुलै ते १५ जुलै या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेंट व सेल यांच्या पुढाकारातून पेट्रोल पंप परिसरात ही मोहीम राबविली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल व आर्गनायझेशन्सचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहे, असेही रितेश (रामू) तिवारी यांनी म्हटले आहे.

Web Title: A series of agitations by the City District Congress against fuel and inflation