शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

लस न घेणाऱ्यांना घरी पाठविले; कोळसा उत्पादनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आता लसीकरणासाठी ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे.  इतकेच नव्हे, तर कामगारांकडून ११ ऑगस्टपर्यंत लस घेण्याबाबतचे वचनपत्र लिहून घेण्यात आले आहे.

राजेश रेवतेलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोली माजरीअंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणीतील कामगार  आणि अधिकाऱ्यांना कोविडची लस घेतल्याशिवाय खाणीत प्रवेश देणार नाही, असा फतवा वेकोली प्रबंधनाने काढला होता. १ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणीही केली. लस न घेतलेल्या शेकडो कामगारांना दोन दिवस कामावर न घेता घरी पाठविले. याचा फटका कोळसा उत्पादनावर होताच वेकोली व्यवस्थापनाने आपल्या फतव्याला ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. १ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आता लसीकरणासाठी ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे.  इतकेच नव्हे, तर कामगारांकडून ११ ऑगस्टपर्यंत लस घेण्याबाबतचे वचनपत्र लिहून घेण्यात आले आहे. या पत्रात कामगारांनी ११ ऑगस्टपूर्वी स्वतः लस घेऊन प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक डोसचा तुटवडासहा दिवसांपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा आहे. कामगारांनी दिलेल्या वचनपत्रानुसार त्या कालावधीत लसीकरण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. ११ ऑगस्टपूर्वी  वेकोली प्रबंधनाने कामगारांकरिता लसीकरणाकरिता विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. 

वेकोलीच्या कामगार संघटनेने कामगारांना लस घेण्याबाबत मुदत मागितली होती. त्यांच्या मागणीनुसार  वरिष्ठांच्या निर्देशानुसार कामगारांना मुभा देण्यात आली आहे. काही अटी व शर्ती घालून कामगारांकडून वचनपत्र घेऊन ११ ऑगस्टपर्यंत कामावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.- अशोक जोशी, कार्मिक प्रबंधक, वेकोली माजरी क्षेत्र.

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कोलइंडियाने सर्व कामगार व अधिकाऱ्यांना  कोविड प्रतिबंधात्मक लस बंधनकारक केली आहे.  भीतीपोटी वेकोली प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा. यात अनेक तांत्रिक अडचणीही आहेत. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही लस उपलब्ध नाही. दोन दिवसांचे वेतन मिळावे, यासाठी संघटना वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. - जयनारायण पांडे, प्रभारी, आयटक कामगार संघटना, माजरी क्षेत्र.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस