शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धानाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: December 11, 2014 23:05 IST

भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी

मोहाळी (नलेश्वर) : भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भाजप सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून आता धानाच्या राशी घरी येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अ दर्जाचे धान दोन हजार ते २१०० रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. गत वर्षी तीन हजार रुपयांपर्यत धानाचे दर वाढले होते. मात्र, यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ परिस्थिती, धान पिकांवर विविध रोगाची साथ व सततची नापिकी यामुळे धान उत्पादक शेतकरी वैतागलेला असताना, धानाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी पुर्णता खचला आहे.
मात्र लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेतेमंडळी स्थिर सरकार बनवण्याच्या व एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे संबोधल्या जाते. शेतकरी सुखी तर जग सुखी असेही म्हटल्या जाते. मात्र, आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव बघितले तर जगाचा पोशिंदा खरोखरच सुखी आहे काय? याचा विचार न केलेला बरा.
शेतकऱ्यासारखा कर्जबाजरी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलित जन्म घेतो व कर्जाच्या दलदलित मरतो, हे खर वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दिवसेंदिवस बी-बियाणांचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशकांचे भाव गगणाला भिडणारे, दिवसेंदिवस उत्पादनात घट तर कधी नापिकी, कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट, कधी उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगाची साथ या सर्व कालचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतात राबतो. पण त्याच्या नशिबी कुठले सुख आले. उलट दु:खाचे व कष्टाचे तसेच कर्जाचे डोंगर उभे आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर शासनाने वेळीच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अन्यथा आत्महत्या थांबणार नाही. (वार्ताहर)