शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करुन दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाहनातून २८ हजार ८०० रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली.

ठळक मुद्देतीन महिलांसह चार जणांना अटक : दोन ठिकाणी ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पोलिसांनी चारचाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन देशी विदेशी दारुसाठा जप्त केला. तसेच दुचाकीवाहनधारकांची तपासणी एकूण १२ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी केलेल्या या कारवाईत तीन महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आदित्य वैरागडे (१९), अवतारसिंग दुधानी (३१), बंडू मनीराम शेंडे (३५), धिरज आंनदराव दिघोरे (३३) यांच्यासह तीन महिलांना अटक केली आहे.ब्रह्मपुरी पोलिसांनी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकांद्वारे दारुविक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाहनातून २८ हजार ८०० रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली. तर दुसऱ्या कारवाईत एमएच ३४ एटी ५०६९ व एमएच ३१ बीटी ८६६१ या दोन दुचाकीची तपासणी करुन दारुसाठ्यासह तीन महिला व एकाला अटक केली. दोन्ही कारवाई सुमारे १२ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खोब्रागडे, नापोशी हेमके, नापोशी राँय, नापोशि शुभांगी, पोशि प्रिती, पोशि शिवनकर, कटाईत, भगत आदींनी केली.वरोऱ्यात दहा लाखांचा मुद्देमाल जप्तनागरी रेल्वे गेटकडून माढेळीकडे एका कारमधून दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर नागरी ते माढेळी रोडवर नाकाबंदी केले. दरम्यान एमएच ३२ सी ४७८० संशयित वाहन येताच पोलिसांनी हात दाखवला. वाहनचालकाने वाहन न थांबवता पळ काढून काही अंतरावर गेल्यानंतर माढेळीजवळ गाडी ठेवून पसार झाला. पोलिसांनी दारु व वाहन असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.सिंदेवाहीत १८.५ लाखांचा मुद्देमाल जप्तपोलिसांची चमू गस्त घालत असताना राजोली मार्गे पेटगावकडे एक ट्रक संयशास्पद जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हात दाखविला मात्र ट्रकचालकाने ट्रक वेगाने पळविला. सरडपारजवळ ट्रक थांबवून वाहनचालकाने पळ काढला. पोलिसांनी पंचसमक्ष एम एच ३१ सीबी ३६७७ वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात ३३ नग खर्ड्याच्या खोक्यात १५८४ नग विदेशी दारु, २९ खर्ड्याच्या खोक्यात २९०० नग देशी दारु, सात चुंगड्यामध्ये बांधलेली दारु, तसेच २०० नग टिनाचे पिपे असा एकूण १८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार देवानंद सोनुले, पोलीस शिपाई राहुल यांच्यासह सिंदेवाही पोलिसांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस