जप्तीचा ट्रक तहसील कार्यालयातून पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:32+5:30

विधानसभा निवडणुकीमुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता सदर ट्रक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे ट्रक सदर परिसरात नेण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून चालकाने वाहनासह पसार झाला.

The seized truck escaped from the tahsil office | जप्तीचा ट्रक तहसील कार्यालयातून पळविला

जप्तीचा ट्रक तहसील कार्यालयातून पळविला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : अवैध रेती तस्करी करताना ताब्यात घेतलेला ट्रक तहसील कार्यालय परिसरातून गायब झाल्याचे बुधवारी उघडकीस आले.
रेती तस्करी प्रकरणात १२ चाकांचे दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले होते. हे ट्रक तहसील कार्यालय परिसरात ठेवले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता सदर ट्रक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे ट्रक सदर परिसरात नेण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून चालकाने वाहनासह पसार झाला. याबाबत तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांना विचारले असता म्हणाले, ट्रक पळवून नेणाऱ्याविरूद्ध पोलिसात तक्रार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Web Title: The seized truck escaped from the tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर