सुमित्रानगरात दुसऱ्यांदा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST2021-02-11T04:30:25+5:302021-02-11T04:30:25+5:30

घरी कोणी नसल्याचा डाव साधून चोरट्यांचे सुमित्रानगर परिसरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. एका आठवड्यापूर्वी चोरट्यांनी येथील एक घर फोडले ...

Second burglary in Sumitranagar | सुमित्रानगरात दुसऱ्यांदा घरफोडी

सुमित्रानगरात दुसऱ्यांदा घरफोडी

घरी कोणी नसल्याचा डाव साधून चोरट्यांचे सुमित्रानगर परिसरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. एका आठवड्यापूर्वी चोरट्यांनी येथील एक घर फोडले होते. त्यानंतर, मंगळवारी मध्यरात्री येथून काही अंतरावर असलेले महेश काळमेघ यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाट उघडून सर्वत्र शोधाशोध केली. त्यात कोणताही किमती ऐवज नसल्याने चोरट्यांना काही चोरून नेता आले नाही. घरात कॅमेरा व चांदीचे भांडे होते. मात्र, ते त्यांनी चोरून नेले नाही. मात्र, चोरट्यांद्वारे येथे केलेल्या धाडसी प्रयत्नाने इतरत्रही चोरी होण्याची दाट शक्यता आहे. चोरट्यांनी चोरी करण्याकरिता वापरलेला हॅन्ड ग्लोव्ज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याबाबत दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Second burglary in Sumitranagar