शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची माहिती मिळणार एसएमएसद्वारे

By admin | Updated: March 25, 2015 01:25 IST

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसह इतर जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते.

खडसंगी : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसह इतर जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी समाजकल्याण विभागाने एसएमएस सुविधा सुरू केली आहे. यासाठी समाज कल्याण विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीकडून संगणक प्रणाली तयार केली आहे. मागील दोन-तीन महिन्यापूर्वी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.कनिष्ठ महाविद्यालय ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विविध जाती, जमातीमधील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये महाविद्यालयाची शैक्षणिक फी व स्टायफंडचा समावेश आहे. शैक्षणिक फी महाविद्यालयाच्या बँकेत असलेल्या खात्यावर जमा करण्यात येते तर स्टायफंड हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातो. मध्यंतरी राज्यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमध्ये गोंधळ केल्यामुळे समाजकल्याण विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर शासनाने शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया विकसीत केली. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्राच्या माहितीसह शिक्षण घेतलेले वर्ष, महाविद्यालयाची माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक तसेच अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्याचा खाते क्रमांक असणे गरजेचे आहे. त्यानंतर प्राचार्याने शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारी फी जमा करून घेण्यासाठी ज्या बँकेत खाते आहे त्याचा क्रमांक अर्जावर टाकणे बंधनकारक केले आहे. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची माहिती समाजकल्याण विभागाकडे एकत्रीत जमा झाल्यामुळे शिष्यवृत्ती जमा करण्याचे काम सोपे झाले. मागील काही महिन्यांपासून संगणक प्रणाली विकसित करून त्यांची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती टाकण्यात आली. मागील दोन महिन्यापासून एसएमएस सुविधा सुरू झाली असून या सुविधेचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना होत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. (वार्ताहर)