शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गरम्य सिंधबोडी तलाव झाले पर्यटनस्थळ !

By admin | Updated: April 11, 2016 00:53 IST

सिंदेवाही तालुक्याला समृद्ध वनवैभवाची परंपरा आहे. सिंदेवाही वनविभाग अंतर्गत कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये .....

निसर्ग पर्यटन भ्रमंतीकरिता खुला : तृणभक्षी प्राण्यांसह हिंस्र वन्यप्राण्यांचाही वावरबाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुक्याला समृद्ध वनवैभवाची परंपरा आहे. सिंदेवाही वनविभाग अंतर्गत कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर हे एक रमणीय स्थळ आहे. हा परिसर आता पर्यटनासाठी खुला करण्यात आला असून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.सिंदेवाहीपासून १० किलोमीटर अंतरावर कचेपार गाव घनदाट जंगलात आहे. कचेपारपासून पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर सिंधबोडी तलाव आहे. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून याला लागून भिवकुंड व कचेपार तलाव आहे तर कक्ष क्रमांक १३४ मध्ये मरेगाव, खैरी मुरपार, चिटकी तलाव आहे. त्यामुळे सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तलावाला लागूनच डोंगर असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. कचेपार जंगल ४९६ चौरस हेक्टर क्षेत्रात असून सिंधबोडी तलाव १० हेक्टर परिसरात पसरलेला आहे. तलावाच्या पाण्याची खोली १५ फूट आहे. या तलावाच्या परिसरात मुक्तपणे फिरणारे पशुपक्षी व वनराई पाहून मन प्रसन्न होते. येथे मोठ्या संख्येने तृणभक्षी, मासभक्षी व वन्यप्राण्याशिवाय सरपटणारे प्राणी, घनदाट जंगल, औषधोपयोगी वनस्पती, वनसंपदा आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळ ब्रह्मपुरी वन प्रकल्पाचे वनक्षेत्र हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या बफर क्षेत्राशी लागून असल्याने मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा संचार व अधिवास विकसित झालेला आहे. तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. वनक्षेत्रातील विविध वनस्पती, पक्षाचा, फुलपाखरांचा, सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर असल्यामुळे येथे वन्यजीव व नैसर्गिक विवधता संपन्न आहे. त्यामुळे हे क्षेत्र निसर्गपर्यटन भ्रमंतीसाठी उपयुक्त आहे. यामध्ये तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. हरीण, गवा, चितळ, सांबर आदींचा संचार वाढला. वन्यप्राण्यामध्ये वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, रानडुक्कर, अस्वल, जंगली मांजर, खवल्या मांजर, मुंगूस, नीलगाय, रानगवा, भेडकी पक्ष्यामध्ये मोर, लांडोर, पोपट, पानबुडी, पान बगडा, कंडेसर, पांढरा आवग, सुतारपक्षी, घुबड, गुरुड, सापामध्ये नाग, घोणस, धामण, गवती साप, फुलपाखरु - कॉमन बटर फ्लॉय, लाईम बटर फ्लाय वनस्पतीमध्ये साग, येन, बिजा, हलदू, करम, धावडा, शिवन, रोहन, गराडी आदीचा समावेश आहे. तलावात परदेशी पक्षाचा विहार असतो. वाघ, बिबट, तडस, रानमांजर, रानकुत्रे, कोल्हा रात्रीला शिकारीच्या शोधात जंगलात भटकत असतात. या तलावावर सर्व प्रकारचे वन्यप्राणी व पशुपक्षी पाणी पिण्याकरिता येतात. इको टुरिझम व जंगल सफारी यासारखे पर्यटकांना आकर्षीत करणारे विविध उपक्रम राबविल्यास हे ठिकाण जंगल पार्यटन क्षेत्र म्हणून विकसित होवू शकते, हे कुणालाही पटेल. येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांनी सिंधबोडी तलाव वनपर्यटन स्थळ व्हावे म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. वनविकास महामंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निसर्ग पर्यटन भ्रमंती कार्यक्रमाचा शुभारंभ ब्रह्मपुरी वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजपूत यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.