शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात मधुमेह औषधांचा तुटवडा

By admin | Updated: April 1, 2015 01:05 IST

ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून मधुमेह आजारांच्या औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ब्रह्मपुरी : ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून मधुमेह आजारांच्या औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महिन्यापासून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठे व प्रमुख असे हे सरकारी रुग्णालय आहे. बरेच खेड्यापाड्यातील नागरिक व शहरातीलही नागरिक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येथे येतात परंतु काही आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व उपकरणांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. अश्यात हे प्रमुख रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर सोडले असल्याने काही बाबतीत अनियमतता असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. तालुक्यात मधुमेह या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. जवळजवळ ७० टक्के लोकांना मधूमेह आजार जडला आहे. यातील श्रीमंत वर्ग निरनिराळ्या खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेत असतात. परंतु मध्यम, गरीब वर्गाला औषधोउपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागते. या आजाराची बाधा झालेले वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही पेन्शनधारक आहेत. काही निराधार आहेत. त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो. सरकारी योजने अंतर्गत अशा आजारावर नि:शुल्क औषधी मिळायची. ती आता दोन महिन्यांपासून दवाखान्यात पोहचली नसल्याने रुग्णांना औषधी मिळणे कठीण झाले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांचे हाल होत आहेत. हातात पैसा नाही व औषधेही मिळत नाही अशा वेळी जीवन कसे जगावे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ताबडतोब मधुमेह आजाराच्या रुग्णांसाठी येथे औषधोपचाराची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)