शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'ताडोबातील नैसर्गिक सौंदर्याने भारावलो'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 2:33 PM

सचिन तेंडुलकरने केली कोलरा गेटमधून सफारी

राजकुमार चुनारकर

चिमूर (चंद्रपूर) - आम्ही मानवाच्या जंगलात वास्तव्य करतो. त्यामुळे आम्हाला जंगल, निसर्ग व त्यामध्ये राहणाऱ्या पशू, पक्षी व इतरही सौंदर्य हे दुर्मिळ झाले आहे. मात्र ताडोबातील अंतर्गत सौंदर्य व येथील रुबाबदार वाघ पाहून भारावलो. त्यामुळेच माझा ताडोबातील मुक्काम वाढला.  येत्या काही दिवसात मी पुन्हा येणार, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन दिवसांच्या ताडोबा भ्रमंतीनंतर रविवारी रिसोर्टमधून जाताना लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

आपल्या वेगवेगळ्या क्रिकेट खेळीने पूर्ण क्रिकेट जगताचा वाघ म्हणून ओळख निर्माण करणारे तथा क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर परिवारासह वाघ्र प्रेमापोटी चिमूर तालुक्यातील रिसॉर्टमध्ये शुक्रवारपासून मुक्कामी होते. रविवारी प्रजासत्ताक दिनी दुपारी १.३० वाजता सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह चेक आऊट करून मुंबईसाठी निघाले. यावेळी रिसॉर्ट आवारात चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

शनिवारी सकाळ व दुपारच्या सफारीत सचिन यांना ताडोबा जंगलातील वाघाने दर्शन दिले. सचिन तेंडुलकर खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त नागपुरात आले असता  शुक्रवारी ते ताडोबा येथे आले होते. लोकमत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ताडोबा वाघासाठी प्रसिद्ध तर आहेच, याशिवाय येथील निसर्गसौंदर्यही अप्रतिम असल्याचे सांगितले. ताडोबातील रुबाबदार वाघ पाहून आपण भारावलो आहे. येत्या काही दिवसात कुटुंबासोबत पुन्हा वाघ्र दर्शनासाठी आपण ताडोबाला येऊ, असेही सचिन तेंडुलकर म्हणाले.

रिसोर्ट परिसरात चाहत्यांची गर्दी

रविवारी सकाळी ताडोबातील सफारीनंतर चिमूर जवळील रिसोर्टमध्ये सचिन मुक्कामी असल्याने त्याला बघण्यासाठी दुपारी सचिनच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. सचिन बाहेर येताच काही बोलेल,अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र तेंडूलकर फारशे बोलले नाही.

आमदार भांगडिया यांनी घेतली सचिनची भेट

ताडोबा सफारीवर असलेले सचिन तेंडुलकर हे परिवारासह दोन दिवसांपासून एका रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. याची माहिती मिळताच चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी सदर रिसोर्टमध्ये जाऊन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या 

कौतुकास्पद! 'या' फळविक्रेत्याला जाहीर झाला पद्मश्री पुरस्कार, बातमी मिळताच व्यक्त केली अशी प्रतिक्रिया...

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना सूचना

''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

Today's Fuel Price : सर्वसामान्यांना दिलासा! सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर

Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी 

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प