Today's Fuel Price petrol diesel prices continue to fall | Today's Fuel Price : सर्वसामान्यांना दिलासा! सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर

Today's Fuel Price : सर्वसामान्यांना दिलासा! सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. गेल्या 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात 2 रुपये 19 पैशांची घट झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. 12 जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात 2 रुपये 19 पैशांची घट झाली आहे. चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे भारतासह अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 79.32 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 26 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.92 रुपयांवर आला आहे. याआधी शनिवारी (11 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 5 पैशांनी महागलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 81.60 रुपये मोजावे लागले.  तर डिझेलच्या दरात वाढ 13 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 72.53 रुपये होता.

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)

दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 73.71रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 25 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 66.71रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. दिल्लीकरांनाही काही दिवसांपूर्वी इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागले. दिल्लीत 11 जानेवारी रोजी पेट्रोलचे दर 5 पैशांनी वधारले होते. तर डिझेल 12 पैशांनी महागले होते. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 76.01 रुपये आणि 69.17 रुपये मोजावे लागले होते. 

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)

महत्त्वाच्या बातम्या 

Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी 

सरपंच थेट जनतेतूनच हवा; ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाला लागणार ब्रेक?

दिग्गज बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

भारतीय लष्कर झालं सज्ज; 40 दिवस युद्धासाठी पुरेल एवढा शस्त्रसाठा केला जमा, कारण...  

Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

 

Web Title: Today's Fuel Price petrol diesel prices continue to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.