CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 08:30 AM2020-01-27T08:30:56+5:302020-01-27T08:35:59+5:30

भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.

youth beaten for anit caa protest in amit shah public address in delhi babarpur | CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

Next
ठळक मुद्देसीएएला विरोध केला म्हणून तरुणाला अमित शहा यांच्यासमोरच मारहाण.तरुणाने भरसभेत उभं राहून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. शहा यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

नवी दिल्ली - सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएएला विरोध केला म्हणून एका तरुणाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोरच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दिल्लीमध्येअमित शहा यांच्यासमोरच एका तरुणाने सीएएला विरोध करत हा कायदा मागे घेण्याची मागणी केली असता जमावाने या तरुणाला प्रचंड मारहाण केली. मात्र शहा यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा रविवारी (26 जानेवारी) दिल्लीच्या बाबरपूरमध्ये आले होते. एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेला संबोधित करत असतानाच एका तरुणाने भरसभेत उभं राहून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच हा कायदा मागे घेण्याची देखील मागणी केली. त्यामुळे सभेला आलेल्या लोकांनी तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. जाहीर सभेत अशा प्रकारची घटना घडल्याने शहा यांनी दखल घेत या तरुणाची सुटका करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडत सभेच्या ठिकाणाहून बाहेर नेऊन सोडले. तसेच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 

अमित शहा यांनी याप्रकारानंतर सीएएच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या कायद्याला विरोध केला आहे. त्यांनी दिल्लीत दंगली घडवून लोकांना भडकावण्याचं काम केलं. अशा लोकांना पुन्हा निवडून दिलं तर दिल्ली सुरक्षित राहणार नाही असं शहा म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असल्याने काँग्रेससह विरोधकांची पोटदुखी होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

भारतीय लष्कर झालं सज्ज; 40 दिवस युद्धासाठी पुरेल एवढा शस्त्रसाठा केला जमा, कारण...  

Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

‘अवनी’चा अहवाल न दिल्यास निधी रोखणार; राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा इशारा

चार शक्तिशाली स्फोटांनी आसाम हादरले, उल्फाने (आय) स्वीकारली जबाबदारी

Delhi Election 2020: कोट्यधीश उमेदवारांमध्ये आप-भाजपचाच बोलबाला; धर्मपाल लाकडा २९० कोटींचे मालक

चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी; कोरोना बळींची संख्या ५६, आजाराच्या विळख्यात १७ शहरे

 

 

Web Title: youth beaten for anit caa protest in amit shah public address in delhi babarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.