शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सुशीदाबगाव : मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.सुशी, दाबगाव मक्ता व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धान पीक घेतल्या जाते. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे साधनही भातपिकच आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा ठेऊन बळीराजाने मोठ्या उत्साहाने धानाची पेरणी केली. मात्र काही दिवसातच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची झळ सहन करावी लागली. एवढेच नाही तर पावसाळाच्या दिवसातच पावसाने दडी मारल्याने धानाची पेरणी करुनही पाण्याअभावी बळीराजाला धानाची रोवणी करता आली नाही. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलक सोय उपलब्ध होती, त्यांनी कशीबशी रोवणी केली. काहींना तर धानाची एक पेंढीही रोवता आली नाही. ज्यांनी रोवणी केली, त्यापैकी काहींची रोवणी पाण्याअभावी जागेवरच करपून गेली तर काहींची रोवणी (पाणी असलेली) जगली. पण त्याही पिकावर रोगाने आक्रमण केले. धान कसेबसे जगून कापणीला आले. मात्र आता रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रानडुकरांनी आपला मोर्चा सुशी दाबगाव व परिसरातील गावांकडे वळविला आहे. शेतात धुमाकूळ घालून या रानडुकरांनी अनेकांच्या शेतीची नासधुस केली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर गावे ही जंगली शिवाराला लागून आहेत. याबाबतीत वनविभाग सूचना देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वन विभागाबद्दल सुशी दाबगाव व परिसरातील शेतकऱ्यांत तिव्र रोष व्यक्त होत आहे. वन विभागाने लक्ष पूरवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)