घोसरीच्या सरपंचपदी रोशनी लोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST2021-02-13T04:26:55+5:302021-02-13T04:26:55+5:30

येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाल्याने कॉंग्रेस गटातील तीन महिला सदस्य दावेदार होत्या. ...

Roshni Lode as Sarpanch of Ghosari | घोसरीच्या सरपंचपदी रोशनी लोडे

घोसरीच्या सरपंचपदी रोशनी लोडे

येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाल्याने कॉंग्रेस गटातील तीन महिला सदस्य दावेदार होत्या. आज अध्याशी अधिकारी संजय जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडीच्या सभेत एकूण ९ पैकी ८ सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी सरपंच पदाकरिता कॉंग्रेसच्या रोशना लोडे यांच्याविरोधात भाजपच्या दुर्गा साईनाथ लोनबले तसेच उपसरपंच पदाकरिता कॉंग्रेसचे जितेंद्र चुदरी, तर भाजपकडून आकाश विलास वडपल्लीवार यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. सदर सभेत गुप्त मतदान घेण्यात घेऊन ५/३ मतांनी ठराव पारित झाल्याने सरपंचपदी रोशनी प्रवीण लोडे यांची, तर उपसरपंच पदावर जितेंद्र चुदरी यांची निवड करण्यात आली.

Web Title: Roshni Lode as Sarpanch of Ghosari