शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:28 IST

वेकोलि माजरी येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेचे टिनाचे छप्पर कोसळल्याची घटना रविवारी घडली.

प्रशासनाचे दुर्लक्ष : सुटी असल्याने विद्यार्थी बचावले लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरी येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेचे टिनाचे छप्पर कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुट्टीचा दिवस असल्याने कोणताही विद्यार्थी शाळेत नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळा ही ६० ते ७० वर्षे जुनी असून ही इमारत वेकोलिने बांधून दिली होती. मात्र या इमारतीची दुरूस्ती करण्यात न आल्याने इमारत व छप्पर पूर्णपणे जीर्ण झाले. त्यामुळे वारंवार तक्रार करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने माजरी येथील शाळेतील लोखंडी छप्परच वर्गखोलीत कोसळले. मुख्याध्यापिका मोरे यांनी वेकोलिचे महाप्रबंधक, शिक्षणाधिकारी, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून शाळा इमारतीचे छप्पर पडल्याची सूचना दिली. परंतु कोणीच या घटनेला गांभीर्याने घेतले नसल्याचे आज दिसून आले. शाळेत अतिरिक्त वर्गखोली नसल्याने मुलांना बसण्यासाठी आता अडचण निर्माण झाली आहे. तत्काळ या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा इतर ठिकाणी शाळा हलवण्यात यावी, मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत सरपंच इंदू कुमरे यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना ही बाब लक्षात आणून देत इमारत दुरुस्ती करीता सांगितले आहे. लवकरच इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.