शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विरुद्धच्या लढ्यात आता रोबोटही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.

ठळक मुद्देचंद्रपूरकरांनी बनविला मेडी रोवर रोबोट : रुग्णांच्या सेवेत रुजू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट शनिवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला. कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रसार झपाटयाने होत आहे. जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी- रोवर नामक रोबो कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे.मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमितकमी संपर्क यावा हा आहे.टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या रोबोटची शुक्रवार पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण उपस्थित होते.हे आहे मेडी-रोवरचे वैशिष्ट्यहा रोबोट वायरलेस असून बॅटरी आॅपरेटेड आहे. याची वाहक क्षमता ३० किलो आहे. या रोबोटला १० मीटरपर्यंत आॅपरेट करता येऊ शकतो. तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान, मेडिसीन, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट सहज हाताळता येणार आहे.

टॅग्स :Robotरोबोट