शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात बेरोजगार युवकांची लूट

By admin | Updated: April 1, 2016 01:25 IST

जिल्हा पोलीस भरतीसाठी अनेक बेरोजगार युवकांनी आपले नामांकन भरले असून या प्रक्रियेसाठी वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : फिटनेस प्रमाणपत्रासाठी आर्थिक भुर्दंड वरोरा : जिल्हा पोलीस भरतीसाठी अनेक बेरोजगार युवकांनी आपले नामांकन भरले असून या प्रक्रियेसाठी वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. परंतु, बीपीएलधारक युवकांना दाखल्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नसतानाही वरोरा उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक युवकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उत्तर वैद्यकीय सेवा गरीब नागरिकास मिळावी म्हणून काही वर्षांआधी वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले. शासनाद्वारे अनेक योजनांचा लाभ नागरिकास मिळावा म्हणून अनेक उपाययोजना सेवा येथे पुरविण्यात आल्या. परंतु, येथील वैद्यकीय अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे येथील नागरिकांना नेहमीच वेठीस धरण्याचे प्रकार रुग्णालयात सुरू आहे. प्रसूतीकरीता बाहेरून येणाऱ्या महिलांकडून प्रसूतीदरम्यान नातेवाईक वर्गास वेठीस धरून हजार दीड हजार रूपये घेण्याचे प्रकार नित्याचेच झाल्याचे नागरिक बोलतात. रात्री पाळीत कार्यरत असलेले अनेक अधिकारी कर्तव्यावर येथे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना येथे प्रतीक्षा करत राहावे लागत असते. त्वरित वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून शासनाने १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध सुरू केल्या आहेत. परंतु, यातील डॉक्टर, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने नेहमी उपचारादरम्यान ताटकळत राहावे लागते, असा प्रकार काही दिवसा अगोदर अनेक नागरिकांनी बघितला. अखेर येथील नगरसेवक राहुल जानवे यांच्याद्वारे रुग्णवाहिका पाठविण्यात आली. मात्र या विलंबामुळे रुग्णांचा बळी गेला.सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक युवक आपले भाग्य आजमावत आहे. यासाठी या युवकांना अनेक वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. मात्र यात शासनाद्वारे बीपीएल धारकांना दाखल्यासाठी पैसे भरण्याकरिता वगळण्यात आले असतानाही येथील वैद्यकीय अधीक्षक हे या युवकांकडून दाखल्याचे १०० रुपये तर इतर तपासणीचे ९० रुपये असे एकूण १९० वसूल करीत असल्याने त्याचा युवकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकूणच उपजिल्हा रुग्णालयातील अनेक सेवा ढेपाळलेल्या असून ठेकेदार पद्धतीमध्ये ठेवण्यात आलेले मजूरच येथे रुग्णांवर टाके मारणे, इंजेक्शन देणे असे प्रकार करताना आढळतात. तेव्हा डॉक्टरला देव मानणाऱ्या रुग्णांवर उपचार बरोबर होत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत असतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)