शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

सुबईतील रस्त्याचे रुपांतर झाले नालीत

By admin | Updated: October 11, 2015 02:14 IST

राजुरा तालुक्यातील सुबई गावातील वॉर्ड क्रमांक तीनमधील नालीत रुपांतर झालेल्या रस्त्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे.

रस्त्यावर अतिक्रमण : रस्त्या चालण्यासाठी की डासांच्या उत्पत्तीसाठी?सुबई : राजुरा तालुक्यातील सुबई गावातील वॉर्ड क्रमांक तीनमधील नालीत रुपांतर झालेल्या रस्त्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. हा रस्ता सोमा राऊत, सुनिल व्यंकटी आत्राम यांच्या घरापासून प्रकाश आत्राम यांच्या घरापर्यंत सुमारे ५० मीटर लांबीचा आहे.सदर रस्ता हा फार जुना असून त्या वॉर्डात आदिवासी बांधवांचे मोेठ्या संख्येने वास्तव्य आहे. परंतु त्या वॉर्डातील रहिवाशांना आज त्या रस्त्यावरुन चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर रस्ता नऊ फुट रुंदीचा असल्याचे समजते. परंतु आज तो रस्ता दोन ते तीन फुट शिल्लक राहिला आहे.त्या वॉर्डात भारतीय सैन्यातील अनिल आत्राम यांचे घर आहे. सध्या परिसरात तापाची साथ सुरू आहे. आणि त्यांच्या घरासमोर पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. सैनिक भारताचे रक्षण करतो. परंतु इथे असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण कोण करणार? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.एका महिलेने बांधकामासाठी बांधकाम साहित्य टाकले. ते पाहून स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्यास सांगितले. परंतु प्रत्यक्षात ज्यांनी पक्के बांधकाम करुन रस्त्यावर अतिक्रमण केले, त्यांना मात्र काहीच सांगितले नसल्याचा आरोप त्या महिलेने सरपंचाकडे तक्रारीतून केला आहे. सदर प्रकरणात अतिक्रमण केलेले नागरिक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात समेट झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी महिलेने व स्थानिक रहिवाशांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. हा प्रश्न मार्गी न लागल्यास गावात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)